`राष्ट्रवादी'तर्फे विधानपरिषदेवर नाशिक विभागातून जळगाव जिल्ह्यात संधी कुणाला?

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला विधानपरिषदेच्या दोन जागा आहेत. त्यात एका जागेसाठी नाशिक विभागातून जळगाव जिल्ह्याला संधी मिळण्याची शक्‍यता असून यात माजी आमदार डॉ. सतीश पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष ऍड. रविंद्रभैय्या पाटील व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नावाची चर्चा आहे.
will satish patil ravindrabhiaya patil or gulabrao devkar get opportunity from jalgaon to mlc 
will satish patil ravindrabhiaya patil or gulabrao devkar get opportunity from jalgaon to mlc 

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला विधानपरिषदेच्या दोन जागा आहेत. त्यात एका जागेसाठी नाशिक विभागातून जळगाव जिल्ह्याला संधी मिळण्याची शक्‍यता असून यात माजी आमदार डॉ. सतीश पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष ऍड. रविंद्रभैय्या पाटील व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नावाची चर्चा आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला दोन जागा आहेत. त्यात पश्‍चिम महाराष्ट्रातून एकाला संधी मिळणार आहे. तर दुसरी जागा ही नाशिक विभागातील आहे. या विभागातून आमदार हेंमत टकले यांची जागा रिक्त होत आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर नाशिक विभागातूनच संधी मिळावी अशीही पक्षात चर्चा सुरू आहे.

नाशिक विभागात येणाऱ्या जळगाव जिल्ह्याला यावेळी संधी मिळावी अशी पक्षनेतृत्वाकहे मागणी होत आहे. या शिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांना खानदेशात जळगाव जिल्ह्याने नेहमीच साथ दिली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी नागपूर विधीमंडळ अधिवेशनावर शेतकरी दिंडी काढण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्याची सुरूवात जळगावपासूनच करण्यात आली होती. त्यावेळी जिल्यातील माजी आमदार (कै.) मु. ग. पवार, (कै.) प्रल्हादराव पाटील त्यांच्यासोबत होते. एस. कॉंग्रेस स्थापना केली त्यावेळीही जिल्हा त्यांच्या पाठीशी होता. त्यांनतर कॉंग्रेसमधून बाहेर पडून पुन्हा "राष्ट्रवादी कॉंग्रेस' स्थापन केल्यावर जळगाव जिल्ह्यातील अनेक नेते त्यांच्यासोबत होते. एके काळी राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्ह्यात सहा आमदार व एका खासदारासह क्रमांक एकचा पक्ष होता. जिल्हयातील सहकार क्षेत्रातही राष्ट्रवादी कॉंग्रेसचा चांगला दबदबा होता. परंतु बदलत्या काळात भाजप आणि शिवसेनेने जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठ्या प्रमाणात फटका बसला. 

आजच्या स्थितीत जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमळनेर मतदारसंघातील अनिल भाईदास पाटील हे एकमेव आमदार आहेत. आमदारकिच्या गणतीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस समसमान असून दोघांचाही एकच आमदार आहे. मात्र जिल्ह्यात कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थिती चांगली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला आजही जनाधार चांगला आहे. सहकार क्षेत्रात आज राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. येत्या काळात जिल्हा बॅंकेच्या निवडणूका होत आहेत. त्यामुळे पक्षासाठी बळ देण्याची गरज आहे. भारतीय जनता पक्षाला तोड देवून भविष्यात पक्षाला चांगले यश मिळविण्यासाठी जिल्ह्याला विधानपरिषदेवर संधी देण्याची गरज आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर त्याबाबत राज्यातील पक्ष नेतृत्वाकडून विचारही करण्यात आला होता. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळाने पक्षाचे नेते शरद पवार यांना प्रत्यक्ष भेटून विनंतीही केली होती. त्यावेळी त्यांनी जिल्ह्याला बळकटी देण्यासाठी विधानपरिषदेवर संधी देण्याबाबत सहमतीही दर्शविली असल्याचे सांगण्यात आले होते.

पक्षातर्फे विधानपरिषदेसाठी आक्रमक नेतृत्व असलेले पारोळा येथील माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. भाजपच्या नेत्यांवर थेट शाब्दीक हल्ला ते करीत असतात. त्यामुळे त्यांना संधी दिल्यास पक्षाला बळकटी येईल असेही सांगण्यात येत आहे. या शिवाय माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नावाचीही चर्चा आहे. त्यांचा स्वभाव शांत आहे. मात्र त्यांचे संघटन कौशल्य चांगले आहे. विद्यमान अध्यक्ष ऍड रविंद्रभैय्या पाटील यांनाही संधी मिळण्याची शक्‍यता आहे. मुक्ताईनगर मतदारसंघात त्यांना आमदारकिने अनेक वेळा हुलकावणी दिली आहे. शांत अणि संयमी व्यक्तीमत्व आहे. त्यामुळे पक्षातर्फे त्यांनाही संधी मिळण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com